धुळे - शहरात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आल्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ते प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आले आहेत. मात्र, प्रशासनाच्या वारंवार आवाहनानंतरही नागरिकांची शहरातली गर्दी कायम आहे.
धुळे शहरातील मुख्य रस्ते प्रशासनाकडून सील.. तरीही नागरिकांची बेशिस्त थांबेना - धुळे कोरोना रुग्ण
धुळे शहरात कोरोनाचे चार रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्ह्याची संख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे.
धुळे शहरात कोरोनाचे चार रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्ह्याची संख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. यात शहरातील चार तर शिंदखेडा तालुक्यातील एका महिलेचा समावेश आहे मंगळवारी सायंकाळी या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून, शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ते सील केले आहेत.
आग्रा रस्ता सभा, तहसील कार्यालय, पाचकंदील परिसर यांचा समावेश आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कतेचा उपाय म्हणून घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने वारंवार करण्यात येत आहे तरी शहरातील नागरिकांची गर्दी कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले.