महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिमुकलीच्या पुढाकाराने गाव होणार पाणीदार, धुुळ्याच्या निमूळगावचा निर्धार

मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीचा प्रत्यय धुळ्यातील निमूळगावच्या ९ वर्षांच्या चिमुकलीकडे पाहून येतोय. संपूर्ण गावाल वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्याचं काम या चिमुकलीनं केलंय.

water cup3

By

Published : May 9, 2019, 2:07 AM IST

धुळे - मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीचा प्रत्यय धुळ्यातील निमूळगावच्या ९ वर्षांच्या चिमुकलीकडे पाहून येतोय. संपूर्ण गावाल वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्याचं काम या चिमुकलीनं केलंय. कोण आहे ही मुलगी? जाणून घेऊया, या विशेष बातमीतून...

bushera water cup


धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ हे साडेपाच हजार लोकवस्ती असलेलं गाव. हे गाव सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरतंय. याला कारण देखील तसंच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईची झळ या गावाने सोसली. मात्र आता हे गाव लवकरच पाणीदार होणार आहे. अभिनेता अमीर खान यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या वॉटर कप स्पर्धेत हे गाव यंदा सहभागी झाले आहे. आणि विशेष म्हणजे गावाला या स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे, ते फक्त एका ९ वर्षाच्या मुलीने. या मुलीचं नाव आहे बुशेरा पिंजारी.

शाळेत दिलेला एक प्रयोग या मुलीने पूर्ण केला आणि हा प्रयोग आनंद मेळ्यात दाखवण्यात आला. यावेळी आलेल्या पाणी फाऊंडेशनच्या काही कार्यकर्त्यांनी बुशेराचा प्रयोग पहिला आणि ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी तिच्या या प्रयोगाचा एक व्हिडिओ अभिनेता आमिर खान यांना दाखवला. प्रयोग बघून स्वतः आमिर खान यांनी बुशेराची या स्पर्धेच्या प्रशिक्षणसाठी निवड केली. प्रशिक्षण पूर्ण करून आल्यावर या मुलीने गावात २१ कॉर्नर सभा घेऊन संपूर्ण गावाला स्पर्धेची माहिती दिली. आणि या स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी पुढाकार घेतला. गावाने देखील स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आणि संपूर्ण गाव श्रमदान करू लागले.


आज गावातील २५० हून अधिक नागरिक दररोज श्रमदान करत आहेत. गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही निर्धार केला असून आमचं गाव पाणीदार करू, असा निश्चय गावाने केला आहे. याचे संपूर्ण श्रेय बुशेरा पिंजरीला दिले जात आहे. तिची स्पर्धेबाबत मार्गदर्शन करण्याची पद्धत आणि कमी वयात आलेली समज याबाबत गावातील प्रत्येक जण तिच्यावर प्रचंड खूश आहे. स्वतः बुशेरादेखील श्रमदान करून स्वतःचा आदर्श घालून देत आहे. गावाला तिचा प्रचंड अभिमान असून संपूर्ण गावाने तिच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. निमगूळ हे गाव या स्पर्धेत विजयी तर होईलच पण त्याहीपेक्षा जास्त पाणीदार होईल यात मात्र शंका नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details