धुळे- माजी नगरसेवक सतिश महाले यांनी आपल्या प्रभागातील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर रोपवाटिका तयार केली होती. महापालिकेच्या जागेवर महाले यांनी कब्जा केला, असा आरोप करत महापालिकेने या रोपवाटिकेतील रोपे जप्त केली. यावेळी महाले यांना सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरुन पोलिसांनी अटक केली आहे.
धुळे: रोपवाटिका प्रकरण चिघळले, सतिश महाले यांना अटक - police
धुळे महापालिकेचे माजी नगरसेवक सतिश महाले यांनी आपल्या प्रभागातील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर रोपवाटिका तयार केली होती. यावेळी रोपवाटिकेतील रोपे जप्त करायला आलेल्या महापालिकेला विरोध केल्यामुळे महाले यांना अटक करण्यात आली आहे.
सतिश महाले यांच्या पत्नी मनिषा महाले यांनी रोपवाटिकेला खासगी टाळे ठोकले होते. या पार्श्वभूमीवर आज सकाळी महापालिकेने रोपवाटिकेचे कुलूप पोलीस बंदोबस्तात तोडले. यावेळी सतिश महाले यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना याठिकाणी पाचारण करावे, त्याशिवाय कारवाई करू दिली जाणार नाही असा पवित्रा घेतला. शिवाय पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घातला. यावेळी डीवायएसपी सचिन हिरे यांनी महाले यांना अटक करण्याचे आदेश दिले.
पोलीस बंदोबस्तामध्ये याठिकाणची रोपे जप्त करण्यात आली. याप्रकरणी आता काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.