धुळे -शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळ असलेल्या रसायन कंपनीच्या स्फोटानंतर कंपनीविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता ही अतिशय भयानक होती. आम्ही आमच्या जीवनात ही घटना विसरू शकत नाही. या कंपनीच्या मालकाविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.
धुळे स्फोट : कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची स्थानिकांची मागणी - मालकविरुद्ध कठोर कारवाई करावी
शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळ असलेल्या रसायन कंपनीच्या स्फोटानंतर कंपनीविरोध नागरिक आक्रमक झाले आहेत. या कंपनीच्या मालकविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.
धुळे स्फोट प्रकरण
शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळ असलेल्या रोमित या रसायन कंपनीत शनिवारी बॉयलरचा स्फोट झाला. या घटनेत १५ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्हा हादरला असून या घटनेनंतर रोमित कंपनी विरोधात पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : Sep 2, 2019, 6:19 PM IST