महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारत बंदला धुळ्यात संमिश्र प्रतिसाद; शिरपूर येथे बसची तोडफोड - banchit bahujan aaghadi

वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर आता बहुजन क्रांती मोर्चाने भारत बंदची हाक दिली आहे. बहुजन क्रांती मोर्चाकडून बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात बंद पुकारला. धुळे शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर मुस्लीम बहुल भागात कडकडीत बंद पाळण्यात आला.

बंदला संमिश्र प्रतिसाद
बंदला संमिश्र प्रतिसाद

By

Published : Jan 29, 2020, 1:04 PM IST

धुळे - बहुजन क्रांती मोर्चाने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक विरोधात पुकारलेल्या भारत बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठ वगळता मुस्लीम बहुल भागात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

भारत बंदला धुळ्यात संमिश्र प्रतिसाद

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू आहे. तर मुस्लिमबहुल भागातील व्यापाऱ्यांनी तसेच व्यवसायिकांनी कडकडीत बंद पाळला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे या बंदला हिंसक वळण लागले असून याठिकाणी कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. तर अन्य ठिकाणी मात्र शांततेत बंद पाळण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details