धुळे- लोकसभच्या धुळे मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्यात लढत होणार आहे. डॉ.भामरे हे अनुभवी खासदार आहेत, तर कुणाल पाटील हे नवखे उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या जमेच्या आणि कमकुवत बाजू काय आहेत.. पाहूया या विशेष बातमीतून.
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच उमेदवारांनी आपल्या मतदार संघात प्रचाराला जोरदार सुरुवात केली. धुळे लोकसभा मतदार संघात भाजप शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांनी एकमेकांविरोधात प्रचार करत आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. भाजपचे उमेदवार भामरे हे अनुभवी खासदार आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील हे लोकसभा निवडणुकीतले नवखे उमेदवार आहेत. डॉ सुभाष भामरे यांच्यातील कौशल्य पाहून त्यांच्यावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच पुलवामा येथील हल्ल्यानंतर पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकमुळे डॉ. सुभाष भामरे हे जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरले होते.
डॉ. सुभाष भामरे यांचाजन्म ११ सप्टेंबर १९५३ रोजी झाला. त्यांनी एमबीबीएस, एमएस (ग्रांट मेडिकल कॉलेज, मुंबई) पदवी घेतली आहे.
डॉ. सुभाष भामरे यांच्या काय आहेत जमेच्या बाजू-
भामरेंचा त्यांच्या मतदारसंघात नियमित संपर्क आहे, धुळे मनमाड इंदौर रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. धुळे लोकसभा मतदारसंघातला सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी देखील त्यांची सतत धडपड, माजी खासदारांकडून न झालेली कामे त्यांनी आपल्या कार्यकाळात मार्गी लावली.
कमकुवत बाजू-