धुळे -पालक आणि मुलांमधील संवाद संपत चालला आहे. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी वडील आणि मुलांमधील संवाद वाढायला हवा. मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडत असतानाच त्यांना पालक म्हणून वेळ द्यायला हवा, असे मत धुळ्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांनी व्यक्त केले. दरवर्षी जून महिन्याच्या 21 तारखेला जगभरात 'फादरर्स डे' साजरा केला जातो. 'फादरर्स डे' निमित्त ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी धनंजय दिक्षित यांनी भुजबळ यांच्याशी संवाद साधला.
वडिलांनी मुलांशी संवाद साधायला हवा; धुळ्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकांचे मत - धुळे एएसपी फादर्स डे न्यूज
मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी वडील आणि मुलांमधील संवाद वाढायला हवा. मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडत असतानाच त्यांना पालक म्हणून वेळ द्यायला हवा, असे मत धुळ्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांनी व्यक्त केले.
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात मुले आणि वडिलांचा संवाद दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे मुले देखील हळूहळू वडिलांपासून दूर जातात व तंत्रज्ञानाला जवळ करतात. त्यामुळे वडिलांनी कामाच्या व्यापातून वेळ काढून मुलांशी संवाद साधला पाहिजे. त्यांच्या अडचणी आणि प्रश्न समजून घ्यायला हवेत, असे भूजबळ म्हणाले.
कामाच्या व्यापात मी मुलांना वेळ देऊ शकत नसलो, तरी मिळालेला वेळ मी पूर्णपणे मुलांना देतो. त्यांचा स्क्रिनींग टाईम कमी करून त्यांना पुस्तक वाचायला प्रवृत्त करतो. याच पद्धतीचा अवलंबकरून अनेक वडील मुलांच्या जवळ जाऊ शकतात, असे भूजबळ यांनी सांगितले.