महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यातील सामोडे फाट्याजवळ ट्रक उलटला, अपघातात रिक्षाचे नुकसान; जीवितहानी नाही - dhule news marathi

रिक्षाच्या दिशेने वेगात येणारा ट्रक बघून, रिक्षाचालकाने आणि शेजारी बसलेल्या इसमाने वेळीच प्रसंगावधान राखत, चालत्या रिक्षातून उडी घेतली. यामुळे या दोघांचा जीव वाचला.

dhule-accident-news-truck-fell-on-ape-rickshaw-no-casualties-reported

By

Published : Aug 11, 2019, 7:26 PM IST

धुळे - सामोडे येथे दहिवेल फाट्याजवळच्या वळणावर ट्रक उलटून अपघात झाला आहे. ट्रक चालकाचे वेगावर नियंत्रण न राहिल्याने ही दुर्घटना घडली. मात्र, यामध्ये, समोरून येत असलेल्या अॅप्पे रिक्षावर हा ट्रक जाऊन आदळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

धुळे: सामोडे फाट्याजवळ अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही
ट्रक कोसळल्याने चक्काचूर झालेली रिक्षा

रिक्षाच्या दिशेने वेगात येणारा ट्रक बघून, रिक्षाचालकाने आणि शेजारी बसलेल्या व्यक्तीने वेळीच प्रसंगावधान राखत, चालत्या रिक्षातून उडी घेतली. यामुळे या दोघांचा जीव वाचला.

या दुर्घटनेमध्ये ट्रक चालकास किरकोळ जखम झाली असून, रिक्षा चालकाच्या प्रसंगावधनाने जीवितहानी टळली आहे. मात्र, रिक्षा ट्रक खाली चिरडल्याने रिक्षाचे आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details