धुळे - शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी जनावरे जखमी झाले, तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याची मागणी नुकसानग्रस्तांनी प्रशासनाकडे केली आहे.
धुळे जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा; मालमत्तेसह शेती पिकांचे नुकसान - heavy rain
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी जनावरे जखमी झाले, तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले.
धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र, ग्रामीण भागात वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. धुळे तालुक्यातील शिरुड, विंचूर, जुनवने, बोरकुंड या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विंचूर शिवारात संपत बोरसे यांच्या पोल्ट्रीची भिंत कोसळून ५०० कोंबड्या मरण पावल्या. तर सुभाष बोरसे यांच्या शेतातील पत्र्याचे शेड उडून जनावरे जखमी झाल्याची घटना घडली.
शिरुड शिवारात नितीन कोतेकर या तरुण शेतकऱ्याने युनियन बँकेचे ५० लाख रुपये कर्ज घेऊन टाकलेल्या पॉली हाऊस वादळात जमीनदोस्त झाले. या नुकसानीची आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.