धुळे- शहरातील एकविरा देवी मंदिरात वटपौर्णिमेचा सण भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
एकविरा देवी मंदिरात भक्तिमय वातावरणात वटपौर्णिमेचा सण साजरा - विविध धार्मिक कार्यक्रम
शहरातील एकविरा देवी मंदिरात वटपौर्णिमेचा सण भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
आंब्यांची आरास करण्यात आलेल्या आई एकविरा देवीचे छायाचित्र
आई एकविरा देवी मंदिर हे महाराष्ट्रातील ५ वे शक्तीपीठ आहे. आज वटपौर्णिमेनिमीत्त येथे आंब्याची आरास करण्यात आली होती. यावेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमही संपन्न झाले. अतिशय सुंदर अशी ही आंब्याची आरास पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. वटपौर्णिमेनिमित्त मंदिरात महापूजा, अभिषेक, असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी सजावटीसाठी ठेवण्यात आलेले आंबे हे अनाथाश्रम, वृद्धाश्रम याठिकाणी देण्यात येणार आहेत.