धुळे : कोरोना रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी कथितरित्या पैशांची मागणी करण्यात आल्याचा संतापजनकर प्रकार धुळ्यातून समोर आला आहे. यासंदर्भातील एक कथित व्हिडिओ व्हायरल होत असून यात रुग्णालयातील कर्मचारी बेड मिळवून देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओनंतर या घटनेवर संताप व्यक्त होताना दिसत आहे.
संतापजनक! धुळ्यात कोरोना रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी? - demand of money to get bed for corona patient at dhule
यासंदर्भातील एक कथित व्हिडिओ व्हायरल होत असून यात रुग्णालयातील कर्मचारी बेड मिळवून देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओनंतर या घटनेवर संताप व्यक्त होताना दिसत आहे.

संतापजनक! धुळ्यात कोरोना रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी?
घटनेचा व्हायरल होणारा कथित व्हिडिओ
रुग्णालय प्रशासनाचा बोलण्यास नकार
हा व्हिडिओ कथितरित्या धुळ्यातील एका खासगी रुग्णालयातील असल्याचे सांगितले जात आहे. याविषयी विचारणा केली असता संबंधित रुग्णालय प्रशासनाने यावर बोलण्यास नकार दिला. याप्रकरणी आधी चौकशी करू आणि नंतर बोलू असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
...तर नक्कीच कठोर कारवाई करू-सत्तार