धुळे - येथील मोरदड तांडा गावात काही अज्ञात समाजकंटकांनी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यातील संविधान बचाव कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाईची मागणी; संविधान बचाव कृती समितीची निदर्शने
मोरदड तांडा गावात काही अज्ञात समाजकंटकांनी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यातील संविधान बचाव कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
धुळे तालुक्यातील मोरदड तांडा गावात रविवारी काही अज्ञात समाजकंटकांनी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. या घटनेचे पडसाद सोमवारी धुळे शहरात उमटले.
धुळ्यातील संविधान बचाव कृती समितीच्यावतीने यासंदर्भात निदर्शने करून समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संविधान बचाव कृती समितीच्यावतीने देण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात अप्पर पोलीस अधिक्षक राजू भुजबळ यांना निवेदन देण्यात आले.