धुळे -तालुक्यातील निमगुळ येथे घरातून बेपत्ता झालेल्या दोन वर्षीय चिमुकलीचा मृतदेह विहिरीत पाण्यात तरंगताना आढळून आल्याची घटना नवरात्रीत घडली होती. घरात झोपलेली बालिका विहिरीत गेली कशी, गुप्तधनाच्या लालसेतून तर तिचा बळी देण्यात आला नाही ना, अशा उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. याबाबत पोलिसांचा तपास सुरू असून प्राची प्रवीण सैंदाणे असे खून झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. एकीकडे बँक खाते हॅक करून दोन कोटी रुपये लंपास करणाऱ्या टोळीला गजाआड केले जात असताना दुसरीकडे मात्र प्राचीच्या मारेकऱ्यांचा शोध लागत नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे
धुळे तालुक्यातील निमगुळ गावशिवारातील एका शेतात प्रवीण रामराव सैंदाणे (माळी, वय 29) यांचे झोपडीवजा घर असून ते तेथेच पत्नी, मुलगा व मुलगी प्राचीसह वास्तव्यास आहेत. घटनेच्या दिवशी घराचा दरवाजा आतून लोटला होता. सुरक्षितता म्हणून दरवाज्याला आतून खाट आडवी लावली होती. मात्र, मध्यरात्रीतून प्राची बेपत्ता झाली, ही घटना पहाटे उघडकीस आली. प्रवीण महाजन यांच्यासह पत्नी, नातेवाईकांसह ग्रामस्थांकडून प्राचीचा शोध सुरू झाला. चौकशी सुरू असतानाच गावापासून जवळच असलेल्या शेतालगत एका विहिरीत प्राचीचा मृतदेह आढळला. याबाबत माहिती मिळताच कुटुंबीयांनी धाव घेतली. तपासाअंती मृतदेह प्राचीचा असल्याचे निष्पन्न झाले. तालुका पेालिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेनंतर प्राचीच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र घटना घडून पंधरा दिवस उलटून देखील अद्याप पोलिसांना मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. एकीकडे बँक खाते हॅक करणारी टोळी दिल्लीमधून गजाआड केली जात असताना दुसरीकडे मात्र निमगुल गावातील बालिकेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपींपर्यंत पोलिस पोहोचू शकत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
खुनाचा गुन्हा
धुळ्यातील निमगुळ येथील मृत बालिका न्यायाच्या प्रतीक्षेत
घटनेनंतर प्राचीच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र घटना घडून पंधरा दिवस उलटून देखील अद्याप पोलिसांना मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. एकीकडे बँक खाते हॅक करणारी टोळी दिल्लीमधून गजाआड केली जात असताना दुसरीकडे मात्र निमगुल गावातील बालिकेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपींपर्यंत पोलिस पोहोचू शकत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
धुळ्यातील निमगुळ येथील मृत बालिका न्यायाच्या प्रतीक्षेत
दोन वर्षीय बालिकेचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिला विहिरीत टाकून तिचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. वाढीव कलमान्वये खूनाचा गुन्हा अज्ञाताविरूध्द दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, बालिकेला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी केली जात आहे.