धुळे - 1993 साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमन याचा हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (दि. 26 जून) नाशिक येथे मृत्यू झाला होता. त्याचे शव धुळे जिल्हा रुग्णालयात आणण्यात येणार आहे.
युसूफ मेमनचा मृतदेह धुळ्यात नेणार - युसूफ मेमनचा मृत्यू
1993 साली झालेल्या मुंबई येथील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमन याचा मृतदेह आज धुळे येथील रुग्णालयात आणण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संपादित छायाचित्र
शुक्रवारी मेमनच्या छातीत दुखत असल्याने कारागृह प्रशासनाने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. युसूफच्या मृत्यूनंतर कारागृह प्रशासनाने हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याने सांगितले. धुळे जिल्हा रुग्णालय आवारात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा -धुळे : राष्ट्रवादीचे आमदार पडळकर यांच्या फोटोला 'जोडे मारो आंदोलन'