महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यातील 'ज्योती'वर 'दामिनी'ची कारवाई, अश्लील चाळे करणाऱ्या तरुण-तरुणींना घेतले ताब्यात

धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहात विवाहित जोडप्यांना बसण्यासाठी राखीव असलेल्या जागेवर चित्रपट गृह चालकाकडून जादा दर आकारून महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना बसू दिले जात होते. या ठिकाणी येऊन हे तरुण तरुणी अश्लील कृत्य करतात, अशी माहिती दामिनी पथकाला मिळाली होती.

ज्योती चित्रपटगृहात दामिनी पथकाची कारवाई

By

Published : Jul 3, 2019, 9:23 AM IST

धुळे- शहरातील ज्योती चित्रपटगृहात दामिनी पथकाने धडक कारवाई करून २० महाविद्यालयीन तरुण तरुणींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये १० मुलं आणि १० मुलींचा समावेश आहे. महाविद्यालयीन तरुण तरुणी ज्योती चित्रपट गृहात येऊन अश्लील चाळे करत असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पथकाने ही कारवाई केली असून या प्रकरणी चित्रपटगृह चालकावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पथकाने दिली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

ज्योती चित्रपटगृहात दामिनी पथकाची कारवाई


धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहात विवाहित जोडप्यांना बसण्यासाठी राखीव असलेल्या जागेवर चित्रपट गृह चालकाकडून जादा दर आकारून महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना बसू दिले जात होते. या ठिकाणी येऊन हे तरुण तरुणी अश्लील कृत्य करतात, अशी माहिती दामिनी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकातील एक महिला कर्मचारी आणि एक पोलीस कॉन्स्टेबल यांना याठिकाणी कपल बनवून पाठविण्यात आले होते. या दोघांनी चित्रपट गृहात कपल बॉक्सचे तिकीट घेऊन चित्रपट गृहात प्रवेश केला. थोड्यावेळाने याठिकाणी काही महाविद्यालयीन तरुण तरुणी चित्रपट गृहातील कपल बॉक्समध्ये आले असता, त्या बनावट पोलीस जोडप्याने याची माहिती दामिनी पथकाला दिली. माहिती मिळताच दामिनी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी याठिकाणी येऊन धडक कारवाई करत १० मुलं आणि १० मुलींना ताब्यात घेतले. या कारवाईवेळी काही विद्यार्थी पळून जाण्यात यशस्वी झाले.


याप्रकरणी चित्रपटगृह चालकावर कारवाई करण्यात येणार असून ताब्यात घेतलेल्या मुलांना समज देऊन सोडून देण्यात येईल, अशी माहिती दामिनी पथकाच्या वतीने देण्यात आली आहे. शहरात अनेक ठिकाणी महाविद्यालयीन तरुण तरुणी अश्लील कृत्य करतात. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही, हॉटेल , चित्रपटगृह, सायबर कॅफे याठिकाणी अशा गोष्टी सर्रासपणे चालतात, याला आळा घालण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details