धुळे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. हा निकाल संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. दरवेळी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची सायबर कॅफेवर होणारी गर्दी आता कमी झाली. प्रत्येकजण आपल्या हातातल्या स्मार्ट फोनवरच निकाल पाहत होते. त्यामुळे निकालाच्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांच्या गर्दीने भरणारे सायबर कॅफे ओस पडू लागले आहेत.
सायबर कॅफे आऊटडेटेड, मोबाईलवरच पाहिले विद्यार्थ्यांनी निकाल - ऑनलाईन
दरवेळी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची सायबर कॅफेवर होणारी गर्दी आता कमी झाली. प्रत्येकजण आपल्या हातातल्या स्मार्ट फोनवरच निकाल पाहत होते. त्यामुळे निकालाच्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांच्या गर्दीने भरणारे सायबर कॅफे ओस पडू लागले आहेत.
दहा-बारा वर्षांपूर्वी भारतात इंटरनेटचे आगमन झाले आणि त्याने तरुणाईला भूरळ घातली. त्याकाळात घरोघरी संगणक घेणे शक्य नसल्याने सायबर कॅफेचा नवा उद्योग उदयास आला. मात्र, आज 10 वर्षानंतर स्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज प्रत्येकाच्या बॅगमध्ये लॅपटॉप तर खिशात स्मार्टफोन आला आहे. त्यामुळे सायबर कॅफेकडे वळणाऱ्या पावलांची संख्या रोडावली आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. परंतु, सायबर कॅफेमध्ये यंदा निकाल पाहण्यासाठी कोणी फिरकलेच नाही. सर्वांनी निकाल आपापल्या मोबाईलवरच पाहिले.
दरवर्षी निकालाच्या निमित्ताने सायबर कॅफे चालकांचा व्यवसाय तेजीत असतो. मात्र, आता निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळत नसल्याची खंत कॅफे चालकांनी व्यक्त केली.