महाराष्ट्र

maharashtra

विमा एजंटच्या लॉकरमध्ये आढळले कोट्यवधीचे घबाड, करत होता खासगी सावकारी

By

Published : Jun 4, 2022, 8:10 PM IST

विमा एजंट म्हणून पॉलिसीच्या नावाने अनेकांना अवैध सावकारी करणाऱ्या धुळ्यातील राजेंद्र बंबच्या बँकेतील लॉकरमध्ये कोट्यवधीचे घबाड सापडले आहे. विशेष म्हणजे या राजेंद्र बंबने कोरोनाच्या काळात विविध सामाजिक कार्यक्रम केल्याचा दावा करत त्याचा राज्यपालांनी गौरव केल्याचा गवगवा त्यावेळी करण्यात आला होता.

छायाचित्र
छायाचित्र

धुळे- विमा एजंट म्हणून पॉलिसीच्या नावाने अनेकांना अवैध सावकारी करणाऱ्या धुळ्यातील राजेंद्र बंबच्या बँकेतील लॉकरमध्ये कोट्यवधीचे घबाड सापडले आहे. विशेष म्हणजे या राजेंद्र बंबने कोरोनाच्या काळात विविध सामाजिक कार्यक्रम केल्याचा दावा करत त्याचा राज्यपालांनी गौरव केल्याचा गवगवा त्यावेळी करण्यात आला होता.

बोलताना पोलीस उपमहानिरिक्षक

आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई - धुळे शहरात विमा पॉलिसीच्या आडून अवैध सावकारी करणारा राजेंद्र बंब सध्या पोलीस कोठडीत आहे. आपले कोणत्याही बँकेत लॉकर नाही, अशी तो पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलीस यंत्रणेची, तपास यंत्रणेची दिशाभूल करत होता. मात्र, पोलीस तपास यंत्रणेने त्याचे विविध बँकेतील लॉकर शोधून मुद्देमालाबाहेर काढला. पोलीस, तपास यंत्रणेने शुक्रवारी (दि. 3 जून) राजेंद्र बंबच्या पुन्हा एका लॉकरची तपासणी केली असता त्यात तब्बल 10 कोटी 73 लाखांचे घबाड मिळून आले. याशिवाय विविध देशातील 58 विदेशी चलनही मिळून आले आहे. यात सुमारे पाच कोटी रुपयांची रोकड आहे. सलग तीन दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. अवैध सावकारीबाबत धुळे पोलिसांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

कोट्यवधीचा घबाड जप्त - 10 कोटीच्या या घबाडामध्ये 5 कोटी 13 लाख 44 हजार 530 रोकड, 10 किलो 563 ग्रॅम सोन्याचे विविध दागिने, 67 सोन्याची बिस्कीटे, 5 लाख 14 हजार 911 रुपये किंमतीची 7 किलो 621 ग्रॅम चांदी, 58 विदेशी चलनाचा समावेश आहे. दरम्यान, अवैध सावकारीबाबत काही नागरिकांच्या आणखी तक्रारी आल्या असल्याचे पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. नागरिकांनी अवैध सावकारीबाबत तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी केले.

हेही वाचा -Dhule Crime News : धुळ्यात बनावट मद्यनिर्मीती कारखाना उद्ध्वस्त; पाच जणांना अटक, दोन फरार

ABOUT THE AUTHOR

...view details