धुळे - जिल्ह्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मक्याचं नुकसान झालं असून या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
धुळे: परतीच्या पावसामुळे शेतीचं नुकसान - परतीच्या पावसामुळे शेतीच नुकसान
धुळे जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जिल्हयातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. मात्र यासोबत शेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून पिकांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.
धुळे जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जिल्हयातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. मात्र यासोबत शेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून पिकांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. धुळे जिल्हयातील शिरपूर तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे मक्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. परतीच्या पावसामुळे लाखो रुपयांच नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.