धुळे- तालुक्यातील अजनाळे येथे विवाह समारंभ पार पडण्यापूर्वी वधू-वराने श्रमदान करून नवा आदर्श निर्माण केला. अजनाळे हे गाव वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले असून या गावाला गेल्या वर्षी पारितोषिक मिळाले होते.
धुळ्यात बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू-वराने केले श्रमदान - paani faundation
अजनाळे हे गाव वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले असून या गावाला गेल्या वर्षी पारितोषिक मिळाले होते.
![धुळ्यात बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू-वराने केले श्रमदान](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3315438-thumbnail-3x2-dhule.jpg)
धुळे तालुक्यातील अजनाळे येथे गुरुवारी निहाल पवार आणि निर्जला यांचा शुभविवाह पार पडला. मात्र, विवाह लागण्यापूर्वी या दोघांनी आपल्या गावात सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग होत श्रमदान केले. यावेळी लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी देखील श्रमदान केले. नवरदेव आणि नवरीने केलेले श्रमदान यावेळी चर्चेचा विषय ठरले. निहाल आणि निर्जलाने आपल्या कृतीतून आदर्श निर्माण केल्याची भावना यावेळी व्यक्त केली. गेल्या वर्षी देखील अजनाळे हे गाव या स्पर्धेत सहभागी झाले होते. यंदा देखील या गावाने सहभागी होत आपले गाव दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. या स्पर्धेत आमचे गाव विजयी तर होईलच पण पाणीदार मात्र नक्की होईल, असा विश्वास गावकऱ्यांनी यावेळी केला.