महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात 140 वर्षांची परंपरा जपत साध्या पद्धतीने रथोत्सव साजरा - 140 years old tradition

यंदा सगळ्याच सण-उत्सवांवर कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळाला. 140 वर्षांची परंपरा लाभलेला भगवान बालाजीचा रथोत्सवही साध्या पद्धतीने पार पडला. यावेळी मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निवडक भाविकांच्या उपस्थितीत हा रथोत्सव साजरा करण्यात आला.

सणांवर कोरोनाचा परिणाम
धुळ्यात 140 वर्षांची परंपरा जपत साध्या पद्धतीने रथउत्सव संपन्न

By

Published : Oct 27, 2020, 5:13 PM IST

धुळे - यंदा सगळ्याच सण-उत्सवांवर कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळाला. 140 वर्षांची परंपरा लाभलेला भगवान बालाजीचा रथोत्सवही साध्या पद्धतीने पार पडला. यावेळी मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हा रथोत्सव साजरा करण्यात आला.

धुळ्यात 140 वर्षांची परंपरा जपत साध्या पद्धतीने रथउत्सव संपन्न

सणांवर कोरोनाचा परिणाम

धुळे शहरातील 140 वर्षांची परंपरा लाभलेला बालाजीचा रथोत्सव दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होतो. मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. दरवर्षी दसऱ्यानंतर येणाऱ्या एकादशीला धुळे शहरातून बालाजीचा रथ काढण्याची परंपरा आहे. हा रथ बालाजी मंदिरापासून शहराच्या मुख्य मार्गावरून मार्गस्थ होत असतो. या रथाच्या दर्शनासाठी धुळेकर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. ठिकठिकाणी रथाचे स्वागत केले जाते. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोड भागात व्यापारी व्यावसायिकांकडून रथाची आरती केली जात असते. मात्र दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यंदा मिरवणुका काढण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. बालाजीचा रथ मूळ स्थानावरून काढून मंदिरापर्यंत आणण्यात आला. यावेळी मंदिरात बालाजीची पारंपरिक पूजा करून मूर्तीची रथात प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच मानाची आरती करून हा रथोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details