धुळे -कोरोना आजाराची परिस्थिती रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत सरकारच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने धुळे शहरात काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आले. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत भाजपच्या वतीने राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी भामरे यांनी सरकारमध्ये समन्वय नसल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप केला.
महाराष्ट्र बचाव आंदोलन : राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे कोरोनाचे संकट
संपूर्ण देशात आणि राज्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यात महाराष्ट्र राज्य अव्वलस्थानी असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि त्यात मुंबईमध्ये सर्वाधिक आहेत. त्यामुळे राज्यातील भाजपने ठाकरे सरकारविरुद्ध आज निषेध आंदोलन आयोजित केले होते.
धुळे भाजप आंदोलन: "राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे कोरोनाचे संकट"
संपूर्ण देशात आणि राज्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यात महाराष्ट्र राज्य अव्वलस्थानी असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि त्यात मुंबईमध्ये सर्वाधिक आहेत. मात्र, ही परिस्थिती रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले असून, राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप भाजपने केला आहे.