धुळे -धुळ्यात साध्वी सरस्वती यांनी वादग्रस्त विधान केले आहे. साधवी सरस्वती ( Controversial statement of Sadhvi Saraswati ) या धुळे येथे रामनवमीच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित धर्म सभेत आल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी तरुणांना तलवार बाळगण्याचे आवाहन केले आहे.
धुळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या साध्वी सरस्वतींचे वादग्रस्त विधान, तरुणांना तलवार बाळगण्याचे केले आवाहन - साध्वी सरस्वती धुळे वादग्रस्त विधान
धुळ्यात साध्वी सरस्वती यांनी वादग्रस्त विधान केले आहे. साधवी सरस्वती ( Controversial statement of Sadhvi Saraswati ) या धुळे येथे रामनवमीच्या कार्यक्रमातनिमित्त आयोजित धर्म सभेत आल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी तरुणांना तलवार बाळगण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रमादरम्यान साध्वी सरस्वती यांनी धुळेकरांना संबोधित करत असताना वादग्रस्त विधान केले. काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे नाव घेत, धुळ्यात देखील दुसऱ्या काश्मीर फाईल्सची पुनरावृत्ती ना होवो यासाठी एक लाख रुपयाचा मोबाईल, लॅपटॉप हातात बाळगणाऱ्यांनी एक हजार रुपयाची तलवार देखील हातात ठेवावी. अस्त्रशस्त्र ठेवणे तर आपल्या हिंदूंची शान आहे, असे वादग्रस्त विधान करत साध्वी सरस्वती यांनी हिंदू तरुणांना तलवार हातात बाळगण्याचे आवाहन केले आहे. साध्वी सरस्वती यांच्या या वादग्रस्त विधानाचे काय पडसाद उमटतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा -धुळ्यात पहाटे मार्निंग वॉकला फिरणाऱ्या व्यापाऱ्याची सात तोळ्याची चेन दुचाकीस्वरांनी केली लंपास