धुळे - केंद्र सरकारच्या कृषी आणि कामगार धोरणा विरोधात काँग्रेसच्या वतीने आज शहरात धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने तयार केलेले कायदे हे काळे कायदे असून ते तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी यावेळीं करण्यात आली.
केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन, कृषी धोरणासह हाथरस प्रकरणाचा निषेध - गांधी जयंती धुळे न्युज
गांधी जयंतीनिमित्ताने आज धुळ्यात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या कृषी आणि कामगार धोरणांचा विरोध करण्यात आला. राहुल गांधी धक्काबुक्की प्रकरणाचा निषेध करण्यात आला.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्यांविरोधात तसेच उत्तर प्रदेशमध्ये काल राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यावरील धक्काबुक्की प्रकरणाचा निषेध करत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी गांधी जयंती निमित्ताने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शेतकरी व कामगार बचाव दिन साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या दरम्यान,केंद्रसरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली.