महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महाराष्ट्र बंद'कडे धुळेकरांनी फिरवली पाठ - सीएए

एनआरसी आणि सीएए विरोधात वंचित बहुजन आघाडीने आज(शुक्रवार) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्हाभरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

धुळ्यात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद
धुळ्यात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद

By

Published : Jan 24, 2020, 4:19 PM IST

धुळे -वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदकडे धुळेकरांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी शहरातील सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू ठेवल्याचे दिसून आले.

धुळ्यात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) विरोधात वंचित बहुजन आघाडीने आज(शुक्रवार) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर यासह धुळे तालुक्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, धुळे शहरात या बंदकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसले. यावेळी शहरातील बाजारपेठ सुरळीत सुरू होती.

हेही वाचा - शिरपूरमध्ये घराचे छत अंगावर कोसळल्याने तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. या बंदला जिल्ह्याभरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला, दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या बंददरम्यान जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

हेही वाचा - धुळ्यात ट्रकच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

ABOUT THE AUTHOR

...view details