धुळे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महाजनादेश यात्रा' गुरुवारी धुळे शहरात आली होती. या यात्रेच्या निमित्ताने शहरातून मुख्यमंत्र्यांचा रोड-शो पार पडला. नियोजित कार्यक्रमानुसार, मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रोड-शोला सुरुवात करतील असे ठरले होते. मात्र यावेळी, मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आपल्या वाहनावरून खाली उतरण्याची देखील तसदी घेतली नाही.
मुख्यमंत्र्यांचे शिवरायांना वाहनावरूनच अभिवादन; खाली उतरण्याची तसदी नाही - cm fadnavis
'महाजनादेश यात्रे'च्या निमित्ताने धुळे शहरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी रोड-शो सुरू करण्यापूर्वी शिवरायांना आपल्या वाहनावरूनच अभिवादन केले. यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
![मुख्यमंत्र्यांचे शिवरायांना वाहनावरूनच अभिवादन; खाली उतरण्याची तसदी नाही](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4212960-thumbnail-3x2-dhule.jpg)
CM fadnavis in dhule
मुख्यमंत्र्यांचे शिवरायांना वाहनावरूनच अभिवादन
स्वतः गाडीवरून खाली न उतरता, मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पदाधिकार्यांना शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यास सांगितले. 'शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ भाजपाला साथ' असं म्हणत सत्तेवर आलेल्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना शिवरायांना अभिवादन करण्यासाठी वेळ नसल्याचे पाहून अनेकांना यावेळी आश्चर्य वाटले.