धुळे- गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. धुळे जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केले. तसेच विरोधकांनी मेगाभरतीची नाही तर मेगागळतीची चिंता करावी असे ते यावेळी म्हणाले. महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.
विरोधकांनी 'मेगाभरती'ची नाही, तर 'मेगागळती'ची चिंता करावी - मुख्यमंत्री - मेगाभरती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा धुळे शहरात आली होती. या यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत वार्तालाप साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांनी संवाद यात्रा काढली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा धुळे शहरात आली होती. या यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत वार्तालाप साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांनी संवाद यात्रा काढली आहे. या संवाद यात्रांना माझ्या शुभेच्छा असून, यात्रा ही भाजपची परंपरा आहे, विरोधकांनी मेगाभरतीची नव्हे तर, मेगागळतीची चिंता करावी. गेल्या पाच वर्षात संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. धुळे जिल्ह्यासाठी गेल्या पाच वर्षात विविध विकास कामे करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला गेला. यात भुयारी गटारी, सुलवाडे जामफळ योजना, अक्कलपाडा धरण, अशा विविध सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अक्कलपाडा धरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. हा प्रश्न मार्गी लावण्यात आम्ही यशस्वी ठरलो. यासोबत जलयुक्त शिवाराची विविध विकास कामे केल्याने या जिल्ह्यातील 50हून अधिक गावांचा पाणी प्रश्न पूर्णपणे मिटला आहे. हा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार असल्याचे ते म्हणाले. तसेच मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.