धुळे शहरात वीकेंड लॉकडाऊनबाबत प्रशासनाच्या नियमांचे नागरिकांकडून उल्लंघन - धुळे लॉकडाऊन
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना राज्य शासनाच्या वतीने वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र धुळे शहरात सर्वसामान्य नागरिकांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
![धुळे शहरात वीकेंड लॉकडाऊनबाबत प्रशासनाच्या नियमांचे नागरिकांकडून उल्लंघन Citizens violate administration rules regarding weekend lockdown](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11353012-904-11353012-1618047032632.jpg)
धुळे -संपूर्ण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना राज्य शासनाच्या वतीने वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र धुळे शहरात सर्वसामान्य नागरिकांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड भागातील तसेच अन्य विविध भागातील व्यावसायिकांनी आपली दुकाने पूर्णपणे बंद ठेवली होती. मात्र शहराच्या विविध भागात सर्वसामान्य नागरिकांची तुरळक गर्दी दिसून आली तसेच काही लहान व्यवसायिकांनी आपली दुकाने देखील सुरू ठेवली होती, यामुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ रोखणार तरी कशी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.