धुळे - महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धुळे शहरात 'रोड शो' पार पडला. शहरातील मनोहर चित्र मंदिरापासून या रोड शोला सुरुवात झाली.
महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांचा धुळ्यात 'रोड शो' - road show
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा गुरुवारी धुळे शहरात दाखल झाली. यावेळी शहरातील मनोहर चित्र मंदिरापासून या यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांचा 'रोड शो' पार पडला.
मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा गुरुवारी धुळे शहरात दाखल झाली. यावेळी शहरातील मनोहर चित्र मंदिरापासून या यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांचा रोड शो पार पडला. शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या रोड शोच्या वेळी ठिकठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे, राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या रोड शो दरम्यान मुख्यमंत्र्यांनी धुळेकर नागरिकांना अभिवादन केले. तर, यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी 700 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. धुळे येथून मार्गस्थ झाल्यावर ही यात्रा दोंडाईचा आणि नंदुरबार येथे जाऊन परत धुळ्यात मुक्कामी आली असून शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची धुळे शहरात पत्रकार परिषद होणार आहे.