धुळे -जिल्हा पोल्ट्री संघाच्या वतीने चिकन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. चिकनमुळे कोरोना विषाणूची लागण होत नाही, याची जनजागृती करण्यासाठी या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवलमध्ये धुळेकरांनी चिकनच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेतला.
धुळ्यात खवय्यांनी यांनी लुटला चिकन फेस्टिवलचा आस्वाद हेही वाचा -'महाविकास आघाडीचे सरकार पंधरा वर्ष टिकेल'
संपूर्ण देशात करोना विषाणूबाबत अनेक समज गैरसमज पसरवले जात आहे. त्यातच हा आजार चिकन खाल्ल्यामुळे होत असल्याची देखील अफवा सोशल मीडियावरून पसरवली जात आहे. यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी धुळे जिल्हा पोल्ट्री संघाच्या वतीने चिकन फेस्टिवलचे पांझरा चौपाटी येथे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवलमध्ये चिकनच्या विविध पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. चिकनच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
हेही वाचा -धुळे: दहावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात; जिल्ह्यात 31 हजार 837 विद्यार्थी देणार परीक्षा