महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खूशखबर : सोमवारपासून धावणार चाळीसगाव ते धुळे मेमू रेल्वे

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून चाळीसगाव ते धुळे दरम्यान धावणारी मेमू सेवा रेल्वे ( Memu Railway ) बंद होती. मात्र, आता गेल्या महिन्यापासून काेराेनाच्या रुग्णांची संख्या घटल्याने रेल्वे मंत्रालयाने रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सोमवारपासून (दि. 13 डिसेंबर) ही मेमू रेल्वे धावणार आहे. मात्र, या रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवशांना एक्सप्रसे रेल्वेच्या अनारक्षित तिकिटाइतके पैसे मोजावे लागणार आहे.

मेमू ट्रेन
मेमू ट्रेन

By

Published : Dec 10, 2021, 11:59 PM IST

मुंबई - कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून चाळीसगाव ते धुळे दरम्यान धावणारी मेमू रेल्वे ( Memu Railway ) सेवा बंद होती. मात्र, आता गेल्या महिन्यापासून काेराेनाच्या रुग्णांची संख्या घटल्याने रेल्वे मंत्रालयाने रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सोमवारपासून (दि. 13 डिसेंबर) चाळीसगाव ते धुळे दरम्यान धावणारी मेमू सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहेत. त्यामुळे चाळीसगाव ते धुळे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

असे असणार मेमू रेल्वेचे वेळापत्रक -

01303 मेमू दर सोमवार ते शनिवार 6.30 वाजता चाळीसगाव येथून सुटेल आणि धुळे येथे त्याच दिवशी 7.35 वाजता पोहोचेल.

01304 मेमू धुळे येथून दर सोमवार ते शनिवार 7.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 8.55 वाजता चाळीसगावला पोहोचेल.

01313 मेमू चाळीसगाव येथून दर सोमवार ते शनिवार 17.30 वाजता सुटेल आणि धुळे येथे त्याच दिवशी 18.35 वाजता पोहोचेल.

01314 मेमू धुळे येथून दर सोमवार ते शनिवार 19.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 20.25 वाजता चाळीसगाव येथे पोहोचेल.

दोन्ही गाड्यांची संरचना- 8 मेमू कोच

असे असणार थांबे

बोरस बुद्रुक, जामधा, राजमाने, मोरदड तांडा, शिरूड, बोरविहीर आणि मोहाडी प्रागणे ललींग.

रेल्वे प्रवाशांना भुर्दंड

या मेमू रेल्वेतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अनारक्षित एक्स्प्रेस शुल्काएवढे पैसे भरावे लागणार आहे यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

रेल्वेचे आवाहन

प्रवाशांनी प्रवास करणाऱ्या शहरांमधील कोरोना नियमांचे पालन करवा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

हे ही वाचा -Omicron Patient in Dharavi : टांझानियामधून धारावीत आलेला रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह

ABOUT THE AUTHOR

...view details