महाराष्ट्र

maharashtra

मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्ताने आक्षेपार्ह घोषणा; गुन्हा दाखल

By

Published : Oct 13, 2022, 7:01 PM IST

Prophet Mohammad birth anniversary: मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त Prophet Mohammad birth anniversary धुळे शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा दिल्या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाला Dhule District Police तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. मिरवणूक काढणाऱ्या आयोजकांवर अखेर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Prophet Mohammad birth anniversary
Prophet Mohammad birth anniversary

धुळे:मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त Prophet Mohammad birth anniversary धुळे शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा दिल्या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाला Dhule District Police तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. मिरवणूक काढणाऱ्या आयोजकांवर अखेर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने आक्षेपार्ह घोषणा देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी संतप्त धुळे शहरात महंमद पैगंबर जयंती निमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेमध्ये एका गटाने 'गुस्ताख ऐ नबी की एकही सजा सर तन से जुदा सर तन से जूदा', तसेच 'अगर भारत मे रहना होगा, तो नारा ऐ तकबीर अल्ला हू अकबर कहेना होगा' अशा आक्षेपार्ह घोषणा दिल्याने हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. यात भाजयुमोचे रोहित चांदोडे, नगरसेवक हिरामण गवळी, तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी, हर्षल विभांडी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या समवेत चर्चा करून या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली होती.

अधिक तपास पोलिस करत आहेततसेच या संदर्भातील मोबाईलमध्ये काढलेल्या चित्रीकरणाची क्लिप देखील पोलीस प्रशासनाला सादर करण्यात आली आहे. या प्रकरणात धुळे शहरातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये अखेर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणांचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details