धुळे- उन्नाव बक्सार या ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या घटनेप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी. तसेच महिला सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत, या मागणीसाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने धुळे शहरातून कँडल मार्च काढून पथनाट्यातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
भारतामध्ये सध्या महिला आणि मुलींवर मोठ्याप्रमाणावर अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. देशामध्ये सध्या महिला सुरक्षित राहिल्या नसताना देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे.
सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा कँडल मार्च हेही वाचा - ...म्हणून चंदू चव्हाणने मागितली इच्छा मरणाची परवानगी
हैदराबाद येथे डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर उन्नाव आणि बक्सार या ठिकाणीदेखील याच घटनेची पुनरावृत्ती झाली. महिलांवरील अत्याचाराच्या घटना पाहता 'बेटी बचाव, बेटी पढाव' या उपक्रमाला काळीमा फासला जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
हेही वाचा - कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण
भारतात महिला सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य महिलांनी जगावे कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने यावेळी दिला. यावेळी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.