धुळे -चक्क पोलीस निरीक्षकांच्याच घरी चोरी झाल्याचा प्रकार धुळ्यात समोर आला आहे. आझाद नगर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक आनंद कोकरे हे कुटुंबासोबत बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी चोरी केली. तब्बल 25 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळ्यातील आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे हे सुट्टी असल्याने आपल्या गावी गेले होते, चोरट्यांनी याचा फायदा घेत त्यांचे घर फोडून 10 ते 12 लाख रुपयांचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे, याआधी देखील इथे राहत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरात चोरी झाली होती.
शहरात चोरींच्या घटनांमध्ये वाढ