महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis Warning : धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडेच येईल - देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा

दादासाहेब रावल उद्योग ( Rawal Industry Group ) समूहाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ग्लुकोज फार्मास्युटिकल नवीन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा ( Inauguration ceremony ) कार्यक्रम पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Denvendra Fadanvis ) प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांचा चांदीची गदा व धनुष्यबाण ( Bow and Arrow ) देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी, धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडेच येईल, असा सूचक इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) दिला. तसेच उत्तर महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाईल.

Devendra Fadnavis during the inauguration ceremony
लोकार्पण सोहळा कार्यक्रमप्रसंगी देवेंद्र फडणवीस

By

Published : Jul 31, 2022, 7:26 AM IST

Updated : Jul 31, 2022, 9:53 AM IST

धुळे :हनुमान चालीसा म्हणण्यास आता कुठलीही बंदी नाही. ज्याला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तो हनुमान चालीसा म्हणू शकतो. त्यामुळे आता हनुमानाची गदा पूजा करण्यासाठी ठेवायची आहे. तिला कोणाच्या डोक्यावर चालवण्याची आवश्यकता नाही, असा टोमणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Denvendra Fadanvis ) यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांचे नाव न घेता मारला. सत्कारावेळी देवेंद्र फडणवीस यांना चांदीचे धनुष्यबाण आमदार जयकुमार रावल ( MLA Jayakumar Rawal ) यांच्या कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आले. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी रावल कुटुंबीयांनी दिलेला धनुष्यबाण ( Bow and Arrow ) हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचकडेच असेल, असे सूचक विधान केले आहे.

लोकार्पण सोहळा कार्यक्रमप्रसंगी देवेंद्र फडणवीस

निवडणूक आयोग देणार निर्णय : धनुष्यबाण नेमका कोणाचा? यावर निवडणूक आयोग निर्णय घेईल; दोन्ही दावे पोहचलेत. मात्र, आम्हाला विश्वास आहे सर्वाधिक लोकप्रतिनिधी शिंदेंकडे, सर्वाधिक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेंकडेच, तसेच सर्व तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय सदस्य शिंदेंकडेच आहेत. त्यामुळे रावल कुटुंबीयांनी सत्कार समयी दिलेले धनुष्यबाणदेखील शिंदेंकडे देईन. त्यामुळे पुढे धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडेच येईल, असे सूचक विधान करीत देवेंद्र फडणवीस यांनीही या अग्रिम शुभेच्छा समजतो, असे विधान करून उद्धव ठाकरेंना सूचक इशाराच दिला आहे.

धनुष्यबाण शिंदेकडेच यावा यासाठी बाजू भक्कमपणे मांडली जाईल : देवेंद्र फडणवीस यांनी असे सूचक विधान केले असले, तरीही निर्णय पूर्णतः निवडणूक आयोगाच्या अखत्यारित असणार आहे. अर्थात निवडणूक आयोग हे पूर्ण स्वायत्त असल्याने, निवडणूक आयोग योग्य निर्णय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी बाजू भक्कमपणे मांडली जाईल. निर्णय त्यांना म्हणजे निवडणूक आयोगाला घ्यायचा आहे, असे म्हणत अप्रत्यक्षरीत्या एकनाथ शिंदे यांच्याकडेच धन्युष्यबाण येईल, चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी दोंडाईचा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

रावल उद्योग समूहाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त कार्यक्रम : दादासाहेब रावल उद्योग समूहाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ग्लुकोज फार्मास्युटिकल नवीन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम पार पडला. स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कृषी महाविद्यालय इमारत व बहुउद्देशीय संकुल इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज तसेच श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर लोकनेते सरकारसाहेब रावल यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सहकार महर्षी दादासाहेब रावल सहकारी सूतगिरणीचा ई-भूमिपूजन शुभारंभ कार्यक्रम पार पडला. ७५ हजार रोपे वाटपाचा कार्यक्रम, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ फूट उंच असलेल्या ध्वजस्तंभाचा लोकार्पण सोहळा यानिमित्त दादासाहेब रावल क्रीडा संकुलात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य :नार-पार-गिरणा प्रकल्पाचा कार्यक्रम आपल्याच काळात हाती घेऊन पूर्ण करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य असेल. या ठिकाणचे प्रकल्प जोपर्यंत आपण पूर्ण करू शकत नाही, तोपर्यंत आपण शेतीला पाणी देऊ शकणार नाही. नद्या दिसताहेत, प्रकल्पही झाले आहेत, पाणी तर जबरदस्त दिसतेय, अनेकवेळा बारमाही पाणी दिसतेय, मात्र ते शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहचले पाहिजे. जलयुक्त शिवारामुळे शेतीला फायदा झाला आहे. बागायती क्षेत्र वाढले आहे, फळबाग वाढल्या आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या फलितविषयी सांगितले.


शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करणार : शेतकऱ्यांची शेतीतील उत्पादकता वाढविण्यासाठी राज्यातील कृषी अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अलीकडच्या काळामध्ये शेतीमध्ये नवनवीन संशोधन होत आहेत. ते बदल विद्यार्थ्यांना अवगत होण्यासाठी राज्याच्या कृषी अभ्यासक्रमात बदल करणे आवश्यक आहे. यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी करून जास्तीत जास्त जैविक शेती कशी करता येईल. जैविक खतांचा वापर कमीत कमी करून उत्पादकता वाढवण्यासाठी शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, अशा अनेक गोष्टी कृषी महाविद्यालयात शिकवता येतील.

प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला सुधारित मान्यता : त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार कृषी अभ्यासक्रमात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सिंचनाच्या क्षेत्रात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागातील सिंचनाचे प्रकल्प येत्या काळात पूर्ण करणार असून, नदी-नाल्यातील पाणी जमिनीत अडवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. धुळे, नंदुरबार जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला सुधारित मान्यता देऊन सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रास चालना देण्यासाठी या वर्षीपासून चेतक फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा :Commonwealth Games 2022 : चहावाल्याच्या मुलाने कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला मिळवून दिले पहिले पदक; सांगलीत जल्लोष

Last Updated : Jul 31, 2022, 9:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details