महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मंदिर उडा देंगे...तारीख हम तय करेंगे', धुळ्यातील स्वामीनारायण मंदिर समितीला धमकीचे पत्र - गुन्हा

नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य स्वामी नारायण मंदिर उडवून देऊ, अशी धमकीचे दोन पत्र पोस्टाव्दारे मंदिर समितीला प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

'मंदिर उडा देंगे...तारीख हम तय करेंगे', धुळ्यातील स्वामीनारायण मंदिर समितीला धमकीचे पत्र

By

Published : May 5, 2019, 4:39 PM IST

Updated : May 5, 2019, 4:45 PM IST


धुळे - शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य स्वामी नारायण मंदिर उडवून देऊ, अशी धमकीचे दोन पत्र पोस्टाव्दारे मंदिर समितीला प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी मंदिराला भेट देत तपासणी केली. तसेच मंदिराच्या प्रमुख स्वामींशी चर्चा केली. दरम्यान मंदिरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी


शहरातील देवपूर परिसरात नव्याने भव्य स्वामी नारायण मंदिर उभारण्यात आले आहे. पोस्टाने दोन वेगवेगळी बंद पाकिटे आणि त्यात दोन वेगवेगळी पत्रे मंदिराला प्राप्त झाली. त्यात हिंदीमध्ये 'मंदिर उडा देंगे.. तारीख हम तय करेंगे' अशी धमकी दिली आहे. याबाबत मंदिरातर्फे तत्काळ देवपूर पोलीस ठाण्याला लेखी पत्राव्दारे माहिती देण्यात आली.


हे मंदिर जागतिक तीर्थस्थळ आणि पर्यटन स्थळ बनलेले असून रोज देश, विदेशी भक्तांची आणि पर्यटकांची येथे गर्दी असते. गांधीनगर, अक्षरधाम प्रमाणेच हे मंदिरही जगाच्या नकाशावर आलेले आहे. तरी या पत्रांबाबत तपास करावा आणि सुरक्षा वाढवावी, अशी मागणी केली आहे. त्यानुसार आज पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचार्‍यांसह मंदिराला भेट देवून पाहणी केली. मंदिराच्या प्रमुख स्वामींची चर्चा केली. तसेच मंदिरात पोलीस कर्मचार्‍यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.


या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची यापुढे कसून तपासणी होणार आहे. शहरातील देवपूर भागात हे मंदिर असून मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. याबाबत नागरिकांना देखील माहिती देण्यात आली असून संशियतरित्या कोणी आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Last Updated : May 5, 2019, 4:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details