महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dhule Municipal Corporation: धुळ्याच्या महापौरपदी भाजपच्या प्रदीप कर्पे यांची वर्णी; 19 जुलैला अधिकृत घोषणा - धुळ्याच्या महापौरपदी भाजपच्या प्रदीप कर्पे

धुळ्यात महापौरपदावर कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू झाली. ( Dhule Municipal Corporation ) महापौरपदासाठी अनेकजण इच्छुक होते, अखेर भाजपचे नगरसेवक तथा भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक प्रदीप कर्पे यांचं महापौर पदासाठी एकमेव नामनिर्देशन दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. अधिकृत घोषणा १९ जुलै रोजी होणार आहे.

धुळ्याच्या महापौरपदी भाजपच्या प्रदीप कर्पे यांची वर्णी
धुळ्याच्या महापौरपदी भाजपच्या प्रदीप कर्पे यांची वर्णी

By

Published : Jul 15, 2022, 10:43 PM IST

धुळे - राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने न्यायालयाचा आदेश तसेच शासकीय अभियोक्ता ॲडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड यांच्या अभिप्रायानुसार धुळे महानगर पालिकेतील महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी घोषीत केले. ( Pradeep Karpe ) या घोषणेनंतर महापौरपदावर कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू झाली. महापौरपदासाठी अनेकजण इच्छुक होते, अखेर भाजपचे नगरसेवक तथा भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक प्रदीप कर्पे यांची महापौर पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र तशी अधिकृत घोषणा 19 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे.


धुळे महापौरपदाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका - ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल होती. धुळ्यातील महापौर पदाच्या निवडणुकीत ट्रिपल टेस्टचे पालन केले नाही म्हणून प्रकरण न्याय प्रविष्ट असतांना न्यायालयाचा आदर करत महापौर प्रदीप कर्पे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. अवघे सात महिने ते महापौर पदावर राहिले. धुळे महापौरपदाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होती. या याचिकेचा निकाल १७ मे २०२२ ला लागला.

धुळे महानगर पालिकेचं महापौरपद खुल्या प्रवर्गासा - ठीसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या एक दिवस आधीच म्हणजेच १६ मे २०२२ ला तत्कालीन महापौर प्रदीप कर्पे यांनी आपल्या महापौरपदाचा राजीनामा दिला. या घडामोडींनंतर महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी निघेल याची प्रतीक्षा होती. सोमवारी ११ जुलै यादिवशी ही प्रतीक्षा संपली. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने न्यायालयाचा आदेश तसेच शासकीय अभियोक्ता ॲडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड यांच्या अभिप्रायानुसार धुळे महानगर पालिकेचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी घोषीत केले आहे.

प्रदीप कर्पे यांचा एकमेव अर्ज - या घोषणेनंतर महापौरपदावर कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू झाली. महापौरपदासाठी अनेकजण इच्छुक होते, त्यामुळे अशा अनेक इच्छुकांची नावे पुन्हा चर्चेत होते. मात्र, असे असले तरी न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रदीप कर्पे यांनी मुदतीपूर्वीच राजीनामा दिला होता. पुन्हा महापौर निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे नगरसेवक प्रदीप कर्पे यांचेच नामनिर्देशन दाखल झाल्यानं कर्पे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, या संदर्भातील औपचारिकता १९ जुलै या दिवशी होणार आहे.

हेही वाचा -CM Eknath Shinde : जिथे जातो तेथे मंत्रालय भरते; मुख्यमंत्र्यांकडून जोरदार फटकेबाजी

ABOUT THE AUTHOR

...view details