धुळे - वाढीव वीजबिलांच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने बिलांची होळी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. हे सरकार राज्य करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप खासदार सुभाष भामरे यांनी केला.
धुळे : वाढीव वीजबिलांची भाजपाकडून होळी
वाढीव वीजबिलांच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने बिलांची होळी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. हे सरकार राज्य करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप खासदार सुभाष भामरे यांनी केला.
कोरोना काळात आलेल्या वाढीव वीजबिलांविरोधात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी आज भाजपाच्या वतीने राज्यभरात 'होळी आंदोलन' करण्यात आले. त्याला धुळ्यातही भाजपा कार्यकर्त्यांनी समर्थन दिले. या कार्यक्रमात वीजबिलांची होळी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयात तर तालुका भाजपाने सुभाष भामरे यांच्या राम पॅलेससमोर होळी पेटवून वीज बिलांचे दहन केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
आघाडी सरकारने जनतेशी खेळ चालवला आहे. मुख्यमंत्र्यांनी घरातच राहणे पसंत केले आहे. तेव्हा कुंभकरण सरकारला जागे करण्यासाठी आम्ही हे आंदोलन उभारल्याची माहिती भामरे यांनी दिली. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.
सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होतोय रोष
एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला कामधंदा नसल्याने उपासमारीची वेळ आली. त्यातच महावितरणने वीजबिल आकारल्याने सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलंय. वीजबिल वेळेत न भरल्याने महावितरण कंपनीकडून कनेक्शन कट करण्याची कारवाई होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून रोष व्यक्त होतोय.