धुळे -संपूर्ण राज्यात गेल्या काही महिन्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असून याची गांभीर्याने दखल घेत कठोर संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भाजप महिला आघाडीच्या वतीने धुळ्यात निदर्शने करण्यात आली.
संपूर्ण राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यातच कोरोनाच्या काळातही अतिसंवेदनशील काळातही रुग्णालयांमध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्रही सुरूच आहेत. या घटनांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही.
धुळे: महिला अत्याचाराविरोधात भाजप महिला आघाडीची धुळ्यात निदर्शने - धुळे जिल्हा बातमी
राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून याविरोधात सरकारने कठोर पाऊले उचलावीत, यासाठी भाजप महिला आघाडीच्या वतीने धुळ्यात निदर्शने करण्यात आली आहेत.
सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्याने महिला अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने त्वरित पावले उचलून आरोपींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी भाजपा महिला आघाडीच्या वतीने धुळ्यात निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनविण्यात यावेत व गुन्हेगारांना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली.
हेही वाचा -हाथरस अत्याचार : धुळ्यात मनसेकडून आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन