महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे अमरीश पटेल विजयी - भाजपाचे अमरीश पटेल विजयी

धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी एक डिसेंबर रोजी 99 टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पार पडली. काँग्रेसमधून भाजप आलेले अमरीश पटेल तसेच भाजपामधून कॉंग्रेसमध्ये आलेले अभिजीत पाटील यांच्यात मुख्य लढत होती. यापैकी ३३२ मतं मिळवत पटेल यांनी बाजी मारली.

bjp-candidate-amrish-patel-won-from-dhule-nandurbar-by-election
अमरीश पटेल

By

Published : Dec 3, 2020, 9:58 AM IST

Updated : Dec 3, 2020, 10:55 AM IST

धुळे - नंदुरबार-धुळे विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली आहे. या निवडणुकीत भाजपाचे अमरीश पटेल विजयी झाले आहे. अमरीश पटेल यांना ३३२ मतं मिळाली. तर, काँग्रेसचे अभिजित पाटील यांना ९८ मतं मिळाली. तसेच चार मतं अवैध ठरवण्यात आली. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात मतमोजणी पार पडली.

भाजपा उमेदवार अमरीश पटेल यांच्याशी आमचे प्रतिनिधी धनंजय दिक्षीत यांनी साधला संवाद..

अमरीश पटेल यांनी मारली बाजी -

धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी एक डिसेंबर रोजी 99 टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पार पडली. काँग्रेसमधून भाजप आलेले अमरीश पटेल तसेच भाजपामधून कॉंग्रेसमध्ये आलेले अभिजीत पाटील यांच्यात मुख्य लढत होती. यापैकी ३३२ मतं मिळवत पटेल यांनी बाजी मारली. धुळे-नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपाचे संख्याबळ पाहता त्यांचे पारडे जड असल्याने भाजपाचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता.

धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणूक निकाल..

हेही वाचा -मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; निकाल लांबण्याची शक्यता

हेही वाचा -पदवीधर निवडणूक : मतमोजणीसाठी नागपूर जिल्हा प्रशासन सज्ज

Last Updated : Dec 3, 2020, 10:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details