धुळे- एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपच्या धुळे महानगर शाखेच्यावतीने यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी वारिस पठाण यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने यावेळी करण्यात आली.
धुळ्यात वारिस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला भाजपचे 'जोडे मारो' - BJP agitation against waris pathan
भाजपने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत धुळ्यात आंदोलन केले. या वक्तव्याने समाजात तेढ निर्माण होईल, असे भाजपने म्हटले आहे.
एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य करून देशात विध्वंस करण्याचा तसेच, दोन धर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाजात तेढ निर्माण करणारे ते वक्तव्य होते. या प्रकरणी वारिस पठाण यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी भाजपच्या वतीने धुळे शहरात यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा -भाजप हटवा आरक्षण वाचवा, काँग्रेसचे धुळ्यात धरणे आंदोलन