महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरपूरमध्ये 'भारत बंद'ला हिंसक वळण, आंदोलकांनी केली बसची तोडफोड - Dhule latest news

बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज (बुधवारी) भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला शिरपूरमध्ये हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. आंदोलकांनी या ठिकाणी बसची तोडफोड केली आहे.

शिरपूर
Shirpur

By

Published : Jan 29, 2020, 1:04 PM IST

Updated : Jan 29, 2020, 2:54 PM IST

धुळे- जिल्ह्यातील शिरपूर येथे भारत बंदला हिंसक वळण लागल असून शिरपूर येथे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आंदोलकाना ताब्यात घेतले आहे.

शिरपूरमध्ये 'भारत बंद'ला हिंसक वळण

एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज (बुधवारी) भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला शिरपूरमध्ये हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. शिरपूरहून पानसेमलला जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या बसवर काही अज्ञात आंदोलकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या असून प्रवाशांनाही दुखापत झाली आहे.

या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून सध्या शहरांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

Last Updated : Jan 29, 2020, 2:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details