जळगाव - जिल्ह्यातील अमळनेर येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि त्यांच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेले माजी आमदार बी. एस पाटील यांच्यावर धुळे शहरातील सिद्धेश्वर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. उदय वाघ आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई होत नाही तोवर पक्षाचे काम करणार नाही, असा पवित्रा बी. एस पाटील यांनी घेतला आहे.
जळगाव भाजप अध्यक्ष उदय वाघ गुंडच, त्यांच्यावर कारवाई करा - पाटील - dhule bjp fight
उदय वाघ आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई होत नाही तोवर पक्षाचे काम करणार नाही, असा पवित्रा बी. एस पाटील यांनी घेतला आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि त्यांच्या समर्थकांनी अमळनेर येथे युतीच्या मेळाव्यात माजी आमदार बी. एस पाटील यांना बेदम मारहाण केली. या घटनेत पाटील यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून नाकात रक्ताच्या गाठी तयार झाल्या आहेत. तसेच पोटावर मार लागल्याने त्यांच्या लिव्हरला देखील सूज आली आहे. पाटील यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
या घटनेबाबत बी. एस पाटील म्हणाले, उदय वाघ हे गुंड असून त्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. उदय वाघ यांची पक्षातून हकालपट्टी करावी किंवा त्यांचा राजीनामा घेतला जात नाही तोवर आपण प्रचार करणार नाही, असा पवित्रा बी. एस पाटील यांनी घेतला आहे. झालेल्या घटनेबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.