धुळे - देवपुरातील ॲक्सिस बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले. मात्र चोरट्यांनी किती रुपयांचा मुद्देमाल लंपास केला हे अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळ्यात चोरट्यांनी फोडले ॲक्सिस बँकेचे एटीएम, चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये रोष - AXIS BANK ATM NEWS
धुळ्यातील देवपुरा येथे ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. शहरातील वाढत्या चोरीच्या घटना रोखून पोलिस प्रशासनाने आगामी दिवाळीच्या तसेच सणांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
धुळे शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या चोरीच्या घटना रोखण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरत असल्याची चर्चा सुरू आहे. मध्यरात्री देवपुरातील ॲक्सिस बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले. यात एटीएमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे हे एटीएम शहराच्या मध्यवर्ती भागात असून या परिसरात अन्य बँकांचे एटीएम आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कोकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या चोरीच्या घटनेनंतर ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याची घटना घडली. त्यामुळे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
नागरिकांमध्ये रोष
शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून भावसार कॉलनीत झालेल्या चोरीचा अद्याप तपास लागलेला नाही. त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी पोलीस अधिकाऱ्याच्या घरी झालेल्या चोरीने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील वाढत्या चोरीच्या घटना रोखून पोलीस प्रशासनाने आगामी दिवाळीच्या तसेच सणांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
हेही वाचा -मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 3 मजुरांचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी