धुळे- जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. धुळे जिल्ह्याची ही गरज ओळखून माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी हैद्राबादच्या हेट्रो कंपनीकडून पाच हजार रेमडीसीवर इंजेक्शन मंजूर करून घेण्यात यश मिळविले. हे इंजेक्शन रेमडीसीवर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वाटले जाणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार आज (दि. 12 एप्रिल) रोजी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना 500 रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध झाला असून हा साठा खासदार डॉ. भामरे यांनी जिल्हाधिकारी यादव यांच्याकडे सुपुर्द केला. उर्वरित चार हजार 500 रेमडेसिवीरचा साठा टप्प्या-टप्प्याने उपलब्ध होणार आहे.
खासदार भामरे यांच्या प्रयत्नातून धुळ्यात 500 रेमडीसीवर उपलब्ध - Dhule breaking news
धुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे पाच हजार इंजेक्शन उपलब्ध करुन देणार आहेत. त्यापैकी 500 इंजेक्शन दिले असून उर्वरित साठा टप्प्या-टप्प्याने येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांकडून वैद्यकिय सल्ल्यानुसार रेमडेसिवीरची मागणी केली जात आहे. परंतु या इंजेक्शनच्या उपलब्धतेवर अधिक मागणीमुळे मर्यादा आलेल्या आहेत. धुळे जिल्ह्याची गरज पाहून जिल्हाधिकारी संजय यादव यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांना अधिकाधिक रेमडेसिवीर मिळवून देण्यास सहकार्य करावे, असा आग्रह केला. त्यानुसार खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पाठपुरावा सुरू केला. हैद्राबाद येथील हेट्रो कंपनीने रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या या मागणीनुसार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे हेट्रो कंपनीने कबूल केले. पण, राज्यात देखील या इंजेक्शनला मागणी वाढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उपलब्ध साठ्याचे वितरण करण्याचा वटहुकूम राज्य शासनाकडून काढण्यात आला आहे. त्यानुसार खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर उपलब्ध होणारा पाचशे रेमडेसिवीरचा साठा धुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, कोविड सेंटरला, संलग्न रुग्णालयांना आज वाटप होत आहे.
हेही वाचा -अंत्यसंस्कारासाठी वाहन मिळेना; मृतदेह कचऱ्याच्या गाडीतून स्मशानभूमीत नेण्याची वेळ..!