धुळे- जिल्ह्यातील दोंडाईचा येथे झालेल्या कंटेनर आणि बसच्या भीषण अपघातात 15 जण मृत्युमुखी पडले आहेत. यामधील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत मिळवून देणार, अशी माहिती नंदुरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.
औरंगाबाद-शहादा बस अपघात : मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत देणार - जयकुमार रावल - औरंगाबाद-शहादा बस अपघात
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा पासून 5 किमी अंतरावर असणाऱ्या निमगुळजवळ एसटी आणि कंटेनरच्या भीषण अपघातात 15 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली.
![औरंगाबाद-शहादा बस अपघात : मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत देणार - जयकुमार रावल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4175222-thumbnail-3x2-dh.jpg)
जयकुमार रावल
जयकुमार रावल, नंदुरबार पालकमंत्री
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचापासून 5 किमी अंतरावर असणाऱ्या निमगुळजवळ एसटी आणि कंटेनरच्या भीषण अपघातात 15 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामधील जखमींवर दोंडाईचा रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची तर जखमींनाही मदत राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून मिळून देणार, असल्याची माहिती रावल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.