धुळेधुळे जिल्ह्यात वेल्हाणे - कुंडाणे रस्त्यावर असलेल्या वाघी नदीच्या फरशी पुलावर चालणारी बकरी नदीत बुडाली. बकरी नदीत बुडाल्याने या बकरीला वाचवण्यासाठी बकरीचा मालक गोरख लालसिंग मोरे (वय ५७ वर्ष )यांनी देखील पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
नदीत बुडालेली बकरी वाचवण्याचा प्रयत्न बेतला मालकाच्या जीवावर - goat drowned in the river
धुळे जिल्ह्यात बकरी नदीत बुडाल्याने या बकरीला वाचवण्यासाठी बकरीचा मालक गोरख लालसिंग मोरे (वय ५७ वर्ष )यांनी देखील पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलीस नाईक १३३९ एम आर मोरे हे या घटनेचा तपास करत आहेत.

या घटनेची धुळे तालुका पोलीस स्टेशनला नोंद झाली आहे. पोलीस नाईक १३३९ एम आर मोरे हे या घटनेचा तपास करत आहेत. एका मुक्या प्राण्याला वाचवण्यासाठी मालकानं केलेली धडपड त्याच्याच जीवावर बेतल्यानं गावात या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे. मुके प्राणी आणि माणसांतलं नातं किती घट्ट असू शकतं, याची प्रचिती या घटनेवरुन येते.
अशीच एक अमरावतीतील घटना समोर आली आहे. अमरावती अमरावती शहरातील छत्रीतलाव ते वडाळी परिसर दरम्यान ध्रुतगती महामार्गालगतच मादा बिबटने जन्माला घातलेले 2 बछडे आढळून आले आहेत. Amravati Forest personne त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 2 बछड्यांना जन्म दिल्यावर मादा बिबट लगतच्या जंगलात गेली असल्याने या दोन बछड्यांच्या जिवाला lives of leopard cubs धोका निर्माण झाला होता. Excitement in the area या गंभीर प्रकाराची दखल घेत वन विभागाच्या वन्य प्राणी बचाव पथकाने Wildlife Rescue Team of Forest Department हे दोन्ही बछडे ताब्यात घेऊन त्यांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.