धुळे- आज सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीला प्रचंड यश मिळेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी धुळे लोकसभा मतदार संघातील शिंदखेडा येथे झालेल्या सभेत व्यक्त केला.
सत्ता परिवर्तन होणारच; अशोक चव्हाण यांचे धुळ्यात वक्तव्य - लोकसभा
लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीला प्रचंड यश मिळेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी धुळे लोकसभा मतदार संघातील शिंदखेडा येथे झालेल्या सभेत व्यक्त केला.
धुळे लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा येथे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा पार पडली.
यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी भाजपवर कडाडून टीका केली. यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, भाजप सरकारने सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्किल केले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. आज देशात सरकारविरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जाते, त्यांच्यावर कारवाई केली जाते. आता पुन्हा हे सरकार आले तर हे लोक देश विकतील, तेव्हा आताच सत्ता परिवर्तन करण्याची वेळ आहे, देशाला काँग्रेसच्या विचारधारेची गरज आहे, असे सांगत काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.