धुळे - शहरातील सुप्रसिद्ध चित्रकार समीर शेख हे गेल्या 21 वर्षांपासून लहान मुलांसाठी चित्रकलेचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत. मुलांमधील चित्रकलेची आवड वृद्धिंगत व्हावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. कालबाह्य होत असलेली चित्रकला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित व्हावी यासाठी समीर शेख यांचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या शहरात विविध कलाक्षेत्रात विद्यार्थी जात असतात. या विद्यार्थ्यांना पूर्व प्रशिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. धुळे शहरातील समीर शेख हे उत्तर महाराष्ट्रातील नामवंत चित्रकार असून गेल्या 21 वर्षांपासून ते लहान मुलांना चित्रकलेचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत.
चित्रकलेशी संबंधित विविध ज्ञानशाखांना विद्यार्थी प्रवेश घेत असतात. मात्र, कुठलीही पूर्वतयारी नसल्याने या विद्यार्थ्यांना अपयशाचा सामना करावा लागतो. या विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी समीर शेख हे लहान मुलांसाठी अत्यंत माफक दरात चित्रकलेचे प्रशिक्षण देतात. समीर शेख यांनी आत्तापर्यंत धुळे जिल्ह्यातून अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून हे विद्यार्थी विविध ठिकाणी कार्यरत आहेत.
चित्रकलेला वाव मिळावा यासाठी प्रयत्न -