महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला अमरीश पटेलांनी सोडला काँग्रेसचा 'हात'

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. अमरिश पटेल हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची संपूर्ण राज्यात ओळख होती. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेस पक्षाला गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला रामराम ठोकल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

By

Published : Oct 1, 2019, 10:15 PM IST

अमरीश पटेल

धुळे- जिल्ह्यातील शिरपूर येथील विधानपरिषदेचे आमदार अमरीश पटेल आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पटेल हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अमरिश पटेल यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - संभाजी भिडेंविरोधात धुळ्यात आंदोलन

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. अमरिश पटेल हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची संपूर्ण राज्यात ओळख होती. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेस पक्षाला गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला रामराम ठोकल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा - मंत्रिपद देणार तिकडूनच लढणार; अनिल गोटेंचा सेना प्रवेशाचाही संकेत

गेल्या 2 दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या भाजपच्या मेगा भरतीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमरीश पटेल यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. अमरीश पटेल यांच्यासोबत साक्री येथील विधानसभेचे विद्यमान आमदार डी. एस अहिरे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details