धुळे- शहरासह जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. धरणातील पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाली असून अक्कलपाडा धरणातून 15 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पांझरा नदीपात्रात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे. तसेच या पावसामुळे साथीचे आजार वाढू शकतात. यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे तसेच कोणतीही मदत लागल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.